विचारवंतांचे विचार ऐकण्यासाठीचा मंच म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आहे - सुवर्णा लोळगे

Dhak Lekhanicha
0

 विचारवंतांचे विचार ऐकण्यासाठीचा मंच म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आहे - सुवर्णा लोळगे 


शिरूर, प्रतिनिधी 

शिरूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. विचार मंचाच्या अध्यक्षा, माजी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांनी ही माहिती दिली. या व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष आहे.


दोन दिवसीय व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे प्रथम दिवस मंगळवार, २२ एप्रिल रोजी विषय शिवराय ते भीमराव वक्ते आहेत संजय आवटे (संपादक, लोकमत) व्याख्यानाची वेळ  सायंकाळी ६:३० वाजता असणार आहे.

द्वितीय दिवस बुधवार, दिनांक २३ एप्रिल रोजी विषय: "कोवळी तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात" या विषयावर सारंग आवाड (डी. आय. जी., सी. आय. डी., महाराष्ट्र)  हे आपले विचार मांडणार आहेत कार्यक्रमाची वेळ: सायंकाळी ६:३० वाजता असणार आहे.

कार्यक्रमाचे स्थळ राजभोग बँक्वेट हॉल, शिरूर 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने जास्तीत जास्त नागरिकांनी या ज्ञानवर्धक व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे समन्वयक प्रविण गायकवाड यांनी केले.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!